ओला कंपनी भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB....
इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओलाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ओला कंपनी तामिळनाडूमध्ये जगातील सर्वांत मोठे इलेक्ट्रिक वाहन हब बनवणार आहे ola इलेक्ट्रिकने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या उपस्थितीमध्ये सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. ओला राज्यामध्ये 7614 कोटी रुपयांची
गुतंवणूक करणार आहे.
या प्लांटमध्ये इलेक्ट्रिक कार आणि लिथियम आयन सेल तयार करणार आहे. ओलाच्या या गुंतवणुकीमुळे राज्यात 3,]]] नोकऱ्या निर्माण होणार आहेत. प्रस्तावित चारचाकी वाहन प्रकल्प 200 एकरावर सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील SIPCOT बारगुर मध्ये 20GW बॅटरी उत्पादन क्षमतेचा एक इलेक्ट्रिक फोर व्हिलर आणि EV सेल प्लांटचा समावेश आहे.
Comments
Post a Comment